चर्चासत्रे
आंतरराष्ट्रीय चर्चासत्र :
भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने दि. 15 डिसेंबर 2018 रोजी ‘शेती आणि ग्रामीण
विकास’ या विषयावर आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले. प्रोफेसर डॉ. सप्तर्षी,
प्रवीण (यु.एस.ए.) हे बीजभाषक व श्री. स्कॉट कफोरा
(यु.एस.ए.), डॉ. प्रबीरकुमार रथ (गोवा),
प्राचार्य प्रोफेसर डॉ. अंबादास जाधव (सिल्वासा) इ. मार्गदर्शक पाहुणे,
प्रमुख वक्ते उपस्थित होते. चर्चासत्रात
350 हून अधिक संशोधक-प्राध्यापक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय चर्चासत्र :
भारतातील प्रादेशिक विषमता’ या
विषयावर दि. 15 ते 17 नोव्हेंबर
2002 या कालावधीत तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
प्रोफेसर डॉ. एन. सी.
विजयराज, धारवाड विद्यापीठ, कर्नाटक व डॉ. रायमाने (बेंगलूर
विद्यापीठ) हे बीजभाषक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चर्चासत्रात 300 संशोधक-प्राध्यापक
सहभागी झाले होते.
बायोडीझेल उत्पादन
चर्चासत्र
:
दि. 20 मार्च 2005 रोजी शेतकरी बांधवांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र व जवळच्या बेळगाव (कर्नाटक)
राज्यातील एकूण 193 शेतकरी सहभागी झाले होते.
अग्रणी कार्यशाळा :
भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय उपक्रमातंर्गत
पुढील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
- आपत्ती व्यवस्थापन, दि. 28-02-2014, व्याख्याते - प्रा. संजय ढिगळे,
श्री. अशोक रोकडे, प्रा.
अनिल घस्ते.
- भूगोलशास्त्रातील जी.पी.एस. तंत्राचा उपयोग, दि. 03-02-2016, व्याख्याते - डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. आर. एस. शिकलगार, प्रा. आर. बी. भास्कर.
- भूगोलशास्त्रातील सूदूर संवेदन तंत्र व उपग्रह प्रतिमा वाचन, दि. 30-01-2020, व्याख्याते -डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. आर. एस. शिकलगार, श्री. अभिजीत पाटील
No comments:
Post a Comment