पूरक उपक्रम :
भूगोल दिन, जागतिक लोकसंख्या दिन,
ओझोन दिन, पारंपरिक वेशभूषा दिन असे विशेष दिन
कार्यक्रमांच्या आयोजनाने साजरे होतात. नामवंत व्याख्यात्यांची
मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. सदरच्या उपक्रमांचे
‘वसुंधरा मंडळ’ या विद्यार्थ्यांच्या भूगोल अभ्यास
मंडळामार्फत आयोजन करण्यात येते.
अभ्यास सहली :
तृतीय वर्ष भूगोलशास्त्र विद्यार्थ्यांची ‘दक्षिण भारत अभ्यास सहल’ प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते.
सदरच्या 8 ते 10 दिवसांच्या
अभ्यास सहलीत जे विद्यार्थी सहभागी होत नाहीत त्यांची ‘एक दिवसीय
सहल’ जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना आयोजित करण्यात येते.
प्रतिवर्षी आयोजित होणारी ही सहल हे भूगोल विभागाचे वैशिष्ट्य आहे.
सामंजस्य करार :
मार्च 2019 पासून भूगोलशास्त्र
विभागाचा गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर येथील भूगोलशास्त्र
विभागाशी सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम
व उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी-शिक्षक यांच्यात भूगोलशास्त्र विषयक विचारांची देवाण-घेवाण होते.
विभागीय ग्रंथालय :
भूगोलशास्त्र विभागाचे स्वतंत्र ग्रंथालय असून येथे
अभ्यासक्रमाची 18 पुस्तके, 47 संदर्भ ग्रंथ,
संशोधन जर्नलच्या 27 कॉपीज, 36 नकाशासंग्रह, 5 सी.डी. तसेच स्थलनिर्देशक नकाशे, हवाई छायाचित्रे व उपग्रह प्रतीमा
अभ्यासाठी उपलब्ध आहेत.
सामाजिक बांधिलकी :
भूगोलशास्त्र विभाग सामाजिक बांधिलकीबाबत संवेदनशील
आहे. केरळ महापूर, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूर अशा आपत्तीत बाधितांना अन्न व वस्त्र स्वरूपात मदत
करण्यात तत्परता दाखविली. मुख्यमंत्री कोविड-19 सहाय्यता निधीस प्राध्यापक वर्गाने आर्थिक सहाय्य केले आहे. ध्वजनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निधी यासाठी सहाय्य केले आहे. विभागाच्या विद्यार्थ्यांनी
आश्रमशाळेस भेट देऊन मदत केली आहे. परिसर स्वच्छता उपक्रमात सक्रीय
सहभाग घेतला जातो.
नवोपक्रम :
मसाई पठार पदभ्रमंती, एक दिवस शेतावर, मृदा परीक्षण याबरोबरच विभागाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक तपासणी यासारखे नवोपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर विभागाचा ‘ब्लॉग’ कार्यरत असून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य ब्लॉगद्वारे उपलब्ध होत आहे.
अभ्यासपूरक उपक्रम :
विभागामार्फत Traval and Tourism’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतो.
No comments:
Post a Comment