Thursday, September 16, 2021

Home

Department of Geography 



      1971 साली श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय स्थापन झाले. महाविद्यालयातंर्गत बी.. पदवी अध्ययनाचा भूगोलशास्त्र विभाग सन 1974 पासून सुरू झाला. प्रा. के. एम. केचे, प्रा. एस. आर. घारगे, प्रा. डॉ. एच. एस. वनमोरे या नामवंत प्राध्यापकांनी भूगोलशास्त्र अध्यापनाचे कार्य केले तसेच कालांतराने भूगोलशास्त्र विभागप्रमुख पदाची धुरा सांभाळली. सध्या प्रा. आर. एम. कांबळे विभागप्रमुख पदी कार्यरत असून डॉ. सौ. एन. डी. काशिद-पाटील व प्रा. डॉ. डी. एल. काशिद-पाटील हे सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

सोयी-सुविधा :

      महाविद्यालयाच्या वास्तुतील क्लासरुम नं. 18 19 येथे भूगोलशास्त्र विभाग कार्यरत आहे. रुम नं. 18 हा संगणक व्यवस्थेसह एल.सी.डी. प्रोजेक्टर सुविधेचा व्याख्यान वर्ग असून तो भिंतीवरील विविध नकाशांनी सुसज्ज आहे. रुम नं. 19 ही भूगोलशास्त्र प्रयोगशाळा असून तेथे विविध नकाशे, भौगोलिक उपकरणे, संगणक, छोटे ग्रंथालय आणि प्राध्यापक बैठक व्यवस्था अशा सुविधा आहेत.

No comments:

Post a Comment